एक्स्प्लोर
नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस
जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली. या नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक : शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना ही नोटीस बजावली. या नोटीसला 11 मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव या बाजार समित्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना बाजार समिती आवारातच लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. चेक बाउन्स होणे, शेती मालाचा मोबदला न मिळणे या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने हे पाऊल उचललं.
Before You Go
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्रीडा
क्राईम
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















