मुंबई: मराठमोळा रोईंगपटू दत्तू भोकनळनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रोईंगच्या एकेरी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दत्तूनं पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये 2 किलोमीटरचं अंतर 7 मिनिटं आणि 21.67 सेकंदांत पार करून तिसरं स्थान मिळवलं.

 

दत्तूच्या गटात क्युबाच्या रॉड्रिगेजनं पहिलं आणि मेक्सिकोच्या युआन कॅब्रेरानं दुसरं स्थान मिळवलं.

 

मूळचा नाशिकच्या चांदवडचा रहिवासी असलेला दत्तू 2012 पासून पुण्यात लष्कराच्या सेवेत आहे. ऑलिम्पिक गाठणारा दत्तू पहिलाच मराठी रोईंगपटू आहे. रोईंगच्या एकेरी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी 9 ऑगस्टला होणार असून, त्यात दत्तूच्या कामगिरीवर सर्वांची नजर लागली आहे.