नाशिक: गंगापूर धरणाक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्याने गोदावरी नदीत होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. परिणामी गोदावरीच्या पुराची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे नाशिक जलमय झालं होतं. नाशिकला या पुराचा एवढा मोठा फटका बसलाय की दोन दिवसांनंतरही नाशिकचं जनजीवन पूर्वपदावर आलेलं नाही.
त्यातच आता पुराच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ही नाशिकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
दरम्यान, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी गेलं आहे. तसंच यशवंत मंदिराचा गाभारा पाण्यात गेला आहे.