या वेबसाइटवरील मजकूर हा मुख्य आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वेबसाइटप्रमाणे तयार करण्यात आला होता. त्यामुळे ही वेबसाइट खरी आहे की बनावट हे कुणाच्या लक्षात आलं नाही. या बनावट वेबसाइटमध्ये माहिती देताना 3 हजार 199 जागांसाठी नोकर भरती असून सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनीअर 8, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा 6 विभागांध्ये भरतीची जाहिरात काढण्यात आल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाचा पहिल्यापासून एबीपी माझाने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आलंय कारण नाशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आलीय.
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल
जितेंद्र तायडे असे या प्रकरणी अटक केलेल्या संशियत आरोपीचे नाव आहे. जितेंद्र याला नाशिक सायबर सेल पोलिसांनी अटक जळगाव जिल्ह्यातून अटक केलीय. एबीपी माझाने वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधासाठी रवान केली होती. संशयित आरोपी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान, यात मोठं रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
मागील आठवड्यात आदिवासी विकास विभागात नोकर भरती असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या जाहिरातीची लिंक ओपन केल्यावर एक बनावट वेबसाइट ओपन होत होती. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने ही जाहिरात फिरत होती. मात्र, अशी कोणतीही भरत होत नसल्याची माहिती आदिवासी विभागाकडून देण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. ही लिंक ओपन करुन अनेकांनी अर्ज भरले असून त्यासाठी शुल्कही भरल्याची माहिती आहे. त्यामुळे यापाठीमागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Fake ADVT | आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात