नाशिक: नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इंदिरानगर परिसरात मोकाट कुत्र्यानं एका मुलीला चावा घेत गंभीर जखमी केलं. रात्रीच्या वेळेस घराबाहेर खेळत असलेल्या आशना तोडकर या लहान मुलीवर मोकाट कुत्र्यानं हल्ला केला. कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात आशनाच्या अंगावर जवळपास 20 ते 22 ठिकाणी चावा घेतल्याच्या जखमा आहेत.

महत्त्वाच्या म्हणजे कुत्र्याने केलेला हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या थरारक व्हिडीओतून नाशिकमधील मोकाट कुत्र्यांची दहशत दिसून येते.

गेल्या अनेक दिवसांपासुन नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..रात्रीच्या वेळेस कुत्रे मागे लागत असल्यानं अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. महापालिकेचं निर्बिजीकर्णाच्या ठेक्याचं घोंगडे अद्यापही भिजत पडलंय. परिणामी नाशिककरांचा जीव धोक्यात आला आहे.