Gobardhan Gas : गावातील जमा होणारा कचरा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या हे सगळ्यांसमोरचेच प्रश्न आहेत. पण यावर मार्ग काढत नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल ग्रामपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने एक प्रकल्प उभारला आहे. गोबरधन प्रकल्प असं या प्रकल्पाचं नाव आहे. या गोबरधन प्रकल्पाअंतर्गत शेती, घरगुती , गुरे आदी माध्यमातून जमा होणारा कचरा एकत्र करत त्यावर प्रक्रिया करून ' गॅस ' बनविण्याचा प्रयोग केला आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे, कसा आहे नेमका प्रयोग...?
स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाची 'गोबरधन' योजना
स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने ' गोबरधन ' ही योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांसाठी निवडण्यात आलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीत या प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले . प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्हयात एका गावामध्ये गोबरधन प्रकल्प राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या अंदरसुल या गावाची निवड करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत अंदरसुल गावात ' गोबरधन ' हा गॅस प्रकल्प उभारला असून या प्रकल्पात गाव शिवारातील शेती, सेंद्रिय, गुरांचा तसेच गोशाळेतील कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस बनविण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प असून या प्रकल्पात तयार झालेला ' गॅस ' पाईप लाईनच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वस्त दरात घरपोच पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यातून तयार होणारी 'स्लरी ' ही शेतीसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून उपयोगात देखील येणार आहे. गॅस आणि खत विक्रीतून ग्रामपंचायतीला या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पन्न देखील मिळणार आहे.
सध्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली असल्यामुळे गॅस वापरणे सगळ्याच सर्वसामान्य कुटुंबाला परवडतच असं नाही, मात्र आर्थिक दुर्बल घटक आणि गोरगरिबांना जर थेट घरात पाईपलाईनद्वारे कमी पैशात गॅस उपलब्ध होणार असेल तर या प्रकल्पाचे अंदरसूल गावकऱ्यांनी स्वागत केले आहे. राज्यातील पहिलाच प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषावर गोबरधन प्रकल्पासाठी येवला तालुक्यातील सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या अंदरसुल या गावाची निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :