नाशिक : अॅट्रोसिटी कायदा कडक करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, या मागण्यांसाठी नाशिकमध्ये विराट बहुजन मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या मोर्चात सहभागी झाले होते.

नाशिकच्या गोल्फ कोर्ट मैदानापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदिवासी समाजातील लोकांचा मोर्चात समावेश होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं बहुजन या मोर्चाला पाठिंबा देताना दिसले.

आतापर्यंत ज्याप्रकारे मराठा, ओबीसी समाजाचे शांततापूर्ण आणि शिस्तबद्धपणे मोर्चे निघाले, त्याचप्रमाणे नाशिकमधील बहुजन मोर्चाचे स्वरुप होते. अत्यंत शांत आणि शिस्तब्ध असा हा मोर्चा होता. कुठल्याही नेतृत्त्वाशिवाय निघालेला भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देत पुन्हा गोल्फ कोर्ट मैदानात येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.

पाहा बातमीचा व्हिडीओ :