नाशिक : शिवसेनेच्या पीकविमा कंपन्यांविरोधातील मोर्चानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले असल्याचा दावा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे आज नाशिकच्या येवला भागात दाखल झाले आहेत. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान आदित्य यांनी पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चातून काय साध्य झालं, याबाबत माहिती दिली.


शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने तीन दिवसांपूर्वी मुंबईत मोर्चा काढला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व केले. राज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना पैसे मिळू लागल्याचे आदित्य यांनी सांगितले.

राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे उद्गार

येवला येथील कार्यक्रमात (रॅली) बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ही प्रचारफेरी नाही, सरकारमध्ये असूनही जिथे-जिथे अन्याय होत आहे, तिथे आपण लढलो आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मतदान मिळाले आहे. त्यामुळे मतदारांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे.

जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे

आदित्य म्हणाले की, ही जनआशीर्वाद यात्रा तीर्थयात्रादेखील आहेत. मी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतोय. मला नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आशीर्वाद घेतोय. नवा महाराष्ट्र घडवण्याच्या माझ्या विधानानंतर अनेक जण मला विचारत आहेत की, तुमच्याकडे ब्लू प्रिंट आहे का? माझ्याकडे नव्या महाराष्ट्राचं व्हिजन आहे.

व्हिडीओ पाहा



येवल्यातील आसरा लॉन्स येथूल आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांनी आदित्य यांची धान्यतुला केली.


पीक विम्याची प्रकरणं 15 दिवसात सोडवा, उद्धव ठाकरेंचा मुंबईतल्या मोर्चातून इशारा