एक्स्प्लोर
नाशिकमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हचा कंपनीला 59 लाखांचा गंडा
नाशिक : नाशिकमध्ये फायनान्स कंपनीच्या सेल्स एक्झिक्युटिव्हनं कंपनीला 59 लाखांचा गंडा घातला आहे. बजाज फायनान्सच्या एक्झिक्युटिव्हनं कंपनीची फसवणूक केली आहे. अविनाश कुलकर्णी असं या सेल्स एक्झिक्युटिव्हचं नाव आहे.
बजाज फायनान्सच्या सेल्स एक्झिक्युटिव्हनं 17 ग्राहकांचं बनावट कर्ज प्रकरण तयार केलं. त्यानंतर बोगस ओळखपत्रांच्या साहाय्याने त्यांच्या नावानं गंगापूर रोडवरील थत्तेनगर शाखेत बनावट खातीही बनवली. या खात्यांच्या माध्यमातून सेल्स एक्झिक्युटिव्हनं तब्बल 59 लाख 3 हजारांचा गंडा घातला आहे.
बजाज फायनान्सच्या कायदेशीर सल्लागारांच्या तक्रारीनुसार आरोपी अविनाश कुलकर्णीविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी अविनाश कुलकर्णी अटकेच्या भीतीनं फरार झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement