एक्स्प्लोर
धावत्या स्कूल व्हॅनमधून पडून ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक: नाशिकमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून पडून 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकुंद कोल्हे असं या चिमुकल्याचं नाव असून तो नाशिकमधील समर्थ नगरमध्ये राहत होता. मुकुंद कोल्हे हा चिमुकला काल दुपारी 12.30 वाजता शाळेतून घरी जात असताना नांदुर नाका परिसरात अचानक दार उघडून तो बाहेर रस्त्यावर पडला. चालू व्हॅनमधून थेट रस्त्यावर पडल्यानं मुकुंद यात गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, जखमी मुंकुंदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी व्हॅनचालक रझाक शेखला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने कोल्हे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून शालेय विद्यार्थी वाहतूकीचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
नाशिक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















