Nashik Water Supply Cut : शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) नाशिक  शहरात पाणीपुरवठा राहणार बंद (Water Supply Cut) राहणार आहे. गंगापूर (Gangapur Dam) आणि मुकणे धरणावरील (Mukne Dam) पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित (Power Supply Cut) राहणार असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या (Nashik NMC) पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सहाही विभागात उद्या पाणीपुरवठा होणार नसल्याने शहरवासीयांवर एक दिवसांचे पाणीसंकट ओढवणार आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात चौथ्यांदा पाणीपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत.   


याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर, मुकणे धरणांवरील विद्युत विषयक कामांमुळे महानगरपालिकेतील सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद राहणार असल्याने शनिवारी संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे. गंगापूर धरणावर महानगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनसाठी 132 केव्ही सातपूर व महिंद्र या दोन फिडरवरुन 33 केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो. शिवाय बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. तसेच मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेलसाठी 33 केव्हीचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, गंगापूर धरण येथे नवी थेट जलवाहिनीच्या अंतर्गत नवे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 


नाशिकमध्ये शनिवारी पाणीबाणी 


यासाठी 33 केव्ही दाबाच्या वीजवाहिन्या शिफ्ट करणे, सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे शनिवारी केली जाणार आहेत. तर मुकणे धरण पंपिंग स्टेशनवरील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे हाती घेण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. गंगापूर आणि मुकणे धरणाद्वारे पंपिंग करता येणार नसल्याने सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक शहरातील सहाही विभागात पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास


Guillain Barre Syndrome: पुण्यात जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढला, 20 जण व्हेंटिलेटवर, दोघांचा मृत्यू, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्ध पातळीवर