Dhule Lok Sabha Election 2024 : आपल्या संपत्तीमधील अर्धा वाटा घेवून तो मुसलमानांना वाटण्याचा काँग्रेसचा (Congress) मनोदय आहे. औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये घुसलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवा. काँग्रेस व त्यांचे सर्व सहकारी हे सारखेच आहे. त्यांना जिझियासारखा कर लावायचाय, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांच्या प्रचारार्थ मालेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 


योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणेने भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या पावन भूमीला कोटी कोटी प्रणाम करतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील नमन करतो. ज्यावेळी औरंगजेब हिंदुंवर अत्याचार करत होता. शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. अयोध्येतील राम मंदिर देशाच्या जनतेच्या आस्थ्येचे प्रतिक आहे. 


चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते


140 कोटी जनतेच्या धार्मिक भावनेच्या आधारावर श्रीराम मंदिर बांधले गेले. काँग्रेस सरकार म्हणायचं की, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर दंगे होतील पण हा नवा भारत आहे. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगेचा आमचा संकल्प होता आणि मंदिर बांधले. यासाठी महाराष्ट्रातील हजारो कारसेवकांचे योगदान आहे. काँग्रेसचे सरकार पुन्हा येण्याचे लायकीचे राहणार नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. अबकी बार चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीच संदेह ठेवू नका, पुन्हा मोदी येणार आहे. मालेगाव, धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनाला या, असे आवाहन त्यांनी केले.  


पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात राहायला जावे


भाजपा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पुढे आली आहे. आमची निवडणूक गरिबांना न्याय देण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आमची निवडणूक आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीचा नारा जितेंगे तो लूटेंगे हा त्यांचा संकल्प आहे. आम्हाला भारताला सर्वोच्च स्थानी घेवून जायचं आहे. 2014 च्या पूर्वी भारताला जगात सन्मान कमी होता. आज तो सन्मान वाढला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात बॉम्बस्फोट घडत होते. गरीब भुकेने मरत होते. आतंकवादी कारवाया वाढत होत्या. सण उत्सव काळाच्या आधी भारतात दंगे व्हायचे. आज सीमा सुरक्षित, आतंकवादाचे नामोनिशाण मिटवून टाकले आहे. फटाका जरी फुटला तरी पाकिस्तान सांगते आमचा त्यात हात नाही. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांनी पाकिस्तानात राहायला जावे. भारताचे खातील अन् पाकिस्तानचे गुणगान करतील त्यांना भारतात स्थान नाही. 


सध्याची काँग्रेस महात्मा गांधी यांची काँग्रेस राहिलेली नाही


पाकिस्तानची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या गरीब लोकांना मोदींनी दारिद्यातून बाहेर काढले आहे. आयुष्मान भारत योजनेतून प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत मोफत इलाज मोदींनी दिला. नाना पटोले म्हणतात सत्ता आली तर अयोध्येच्या राममंदिराच्या शुद्धीकरणासाठी येईल. त्यांना उत्तर प्रदेशची जनता सोडणार नाही. हा नवीन हिंदुस्थान आहे. कोणाला छेडत नाही, छेडले तर सोडत नाही. सध्याची काँग्रेस महात्मा गांधी यांची काँग्रेस राहिलेली नाही. आजची काँग्रेस सोनिया, राहुलची काँग्रेस झालेली आहे. काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे मुस्लिम लीगचे घोषणापत्र आहे. अनु.जाती व जमाती यांचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. विद्यमान काँग्रेस महात्मा गांधीवादी काँग्रेस नाही तर सोनिया गांधीवादी काँग्रेस आहे. विद्यमान काँग्रेस सरदार पटेल, लोकमान्य टिळक यांचे काँग्रेस नाही तर राहुल गांधी यांची काँग्रेस आहे.


काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय


काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम आरक्षण समर्थित आहे. काँग्रेस के शहजादे काय म्हणतात ? मी एका झटक्यात गरिबी मिटवतो. वेल्थ इमरजन्सीच्या माध्यमातून गरिबी हटवणार असे राहुल गांधी यांनी सांगितले. आपल्या संपत्तीमधील अर्धा वाटा घेवून तो मुसलमानांना वाटण्याचा त्यांचा मनोदय आहे. औरंगजेबाची आत्मा काँग्रेसमध्ये घुसलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर ठेवा. काँग्रेस व त्यांचे सर्व सहकारी हे सारखेच आहे. त्यांना जिझियासारखा कर लावायचाय, असा आरोप त्यांनी यावेळी केला.जे दंगे करणारे होते त्यांचे सगळ्याचे आम्ही 'राम नाम सत्य'केले. काँग्रेस निवडून आल्यावर गोहत्या करण्यासाठी परवानगी देणार असा जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का ? उत्तर प्रदेशातील आम्ही सगळे कत्तलखाने बंद करून टाकले आहे. काँग्रेस व इंडिया गठबंधन यांचा कोणताच उद्देश नाही. यांच्याकडे कुठलेही व्हिजन सुध्दा नाही. देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आमचे देशाप्रती समर्पण आहे, असे यावेळी त्यांनी म्हटले.  


आणखी वाचा 


CM Yogi Adityanath : काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल; सीएम योगी आदित्यनाथ यांची टीका