Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. यामुळे नाशिकमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी नाशिकमध्ये शोभा यात्रा काढली आहे. यामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच आज सकाळी एबीपी माझाशी संवाद साधताना शांतीगिरी महाराजांनी भाजपसह (BJP) सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आम्हाला पाठींबा दिल्याचा मोठा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दाव्यावर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीएम मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीवेळी शांतीगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटआऊटला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शांतीगिरी महाराजांच्या मोदी प्रेमाने सारेच अचंबित
शांतीगिरी महाराजांची रॅली हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोरून जात असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचार रॅलीत वापरल्या जाणारे वाहन दिसले. या वाहनावर पंतप्रधान मोदींचा कटआऊट होता. प्रतिस्पर्धी उमेदवारच्या वाहनावरील मोदींच्या कटआऊटला पुष्पहार आणि पुष्पवृष्टी केली. शांतीगिरी महाराजांच्या मोदी प्रेमाने सारेच अचंबित झाले असून या कृतीची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
शांतीगिरी महाराजांच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात शांतीगिरी महाराजांकडून अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.
शेतकरी प्रथम प्राधान्य : मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, मालाला हमीभाव, 24 तास वीज आणि पाणी सुविधा देणार.
नागरी सुविधा : अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील 25 वर्षांचा विचार करून आराखडा, वाहतूक कोंडी सोडवणार
उद्योग : नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, आयटी पार्कचा पाठपुरावा करू, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार
कनेक्टिव्हिटी : शिक्षण, योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार, तीर्थक्षेत्र विकास करणार, अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न.
इतर महत्वाच्या बातम्या
Girish Mahajan : छगन भुजबळ खरंच नाराज आहेत का? गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...