सांगली : 2014 च्या आधी देशाचा सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला असल्याचे प्रतिपादन सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले. सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 


जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून विभाजन करण्याचा डाव


सीएम योगी म्हणाले की, काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलत आहे, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होईल अशी त्यांनी भीती आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल. 


तर पाकिस्तान स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही


त्यांनी सांगितले की, सर्वांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला, तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केलं नाही. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही, जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे.  देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी पहिला देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले. राहुल गांधी परदेशात भारताचा अवमान करतात, सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या. 


त्यांनी सांगितले की, मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक हायवे बांधले. आज देशात दुप्पट हायवे झालेआहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती, आज 20 शहरांमध्ये मेट्रो धावत आहे. काँग्रेसने राम मंदिराची उभारणी का केली नाही? काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलतय, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस एक इतिहासजमा  होईल अशी त्यांनी भीती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या