Uddhav Thackeray Nashik Visit Live Updates : उद्धव ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Nashik : अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या निमित्त उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते काळाराम मंदिरात महाआरती करणार आहे. या दौऱ्याचे क्षणाक्षणाचे अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये

अनिरुद्ध जोशीLast Updated: 22 Jan 2024 06:44 PM

पार्श्वभूमी

Nashik News  : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे...More

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदावरी आरती

 


काही वेळापूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रामकुंड येथे दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरीची आरती आणि जलपूजन करण्यात आले. यावेळी 'गंगा गोदावरी माता की जय'च्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रामकुंडाकडे रवाना

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महापूजा आणि महा आरती करण्यात आली. यानंतर आता उद्धव ठाकरे हे रामकुंडाकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हस्ते रामकुंड येथे महाआरती करण्यात येणार आहे.