नाशिक : गेल्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात सात दुर्घटना घडल्या आहेत. यात 23 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आता बुडून मृत्यू झाल्याची आठवी घटना समोर येत आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) दोन सोळा वर्षीय चुलत भाऊ नदीवर पोहण्यासाठी गेले असता दोघांचा पाण्यात बुडून (drown) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सिन्नरमध्ये (Sinnar News) एकच खळबळ उडाली आहे.   


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कुंदेवाडी (Kundewadi) या ठिकाणी देव नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 23) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर वावी या ठिकाणी राहणारे दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघेही सोळा वर्षीय तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. 


देवनदीवरील बंधाऱ्यात दोन जण बुडाले 


सिन्नर येथील कुंदेवाडी परिसरातील देवनदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी हे दोघे उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडू लागले. यावेळी जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी बंधाऱ्यात उड्या मारून या दोघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे सिन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू


नाशिकच्या  इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी होते. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिक, प्रवरा, उजनी आणि राज्यात 22 जणांचा बुडून मृत्यू, सात दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला!


Pune News : आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावंडाचा बुडून मृत्यू; राज्यात तीन दिवसांत 15 जणांचा बळी