पुणे :  पुणे जिल्ह्यातील पाबळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यन नवले  आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षीय बुडालेल्या मुलांची नावं आहेत. एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. यांच्या जाण्याने पाबळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


आर्यन नवले  आणि आयुष नवले हे दोघेही आपल्या मामाच्या घरी उन्हाळाच्या सुट्टीला गेले होते. त्यावेळी उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने आजोबांसोबत दोघेही शेततळ्यावर गेले. यावेळी दोघेही शेततळ्यात पोहायला पाण्यात उतरले. साधारण या पाण्याचा अंदाज या दोघांनाही आला नाही त्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. हे पाहून आजोबा हादरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने पाण्यातुन बाहेर काढलं आणि त्या दोघांना थेट पाबळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोन्ही भावांचा दुदैवी मृत्यू झाला.


नवले कुटुंबियांमध्ये शोककळा


आजोबांच्या गावी मज्जा मस्ती करायला गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नवले कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यातच पाबळ गावातदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. पोटच्या दोन्ही मुलांचा मृत्यू डोळ्यासमोर बघावा लागत असल्याने आई- वडिलांनी आक्रोश मांडला आहे. आर्यन आणि आयुष या दोघांमुळे घरात हसतं खेळतं वातावरण असायचं मात्र यांच्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने घरातील सगळ्यांच्याच चेहऱ्यावरील हसू हरवलं आहे. 


राज्यात 15 जणांना जलसमाधी


उजनी धरणात बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी येथील भावली धरणात (Dam) बुडून 5 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते, त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करुनते पाण्यात पोहोण्यासाठी गेले असता ही भीषण दुर्घटना घडली होती. त्यानंतर नाशिकमध्येच मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आले. त्यानंतर आता पुण्यातील पाबळमध्ये दोन सख्याभावांना मृत्यू  झाला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


'मुलाने  कार मागितली तर त्याला चालवायला दे'; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!