Sudhakar Badgujar नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) महानगरपालिकेच्या (NMC) रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आज शनिवारी (दि. 20) न्यायालयात सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनावर (Anticipatory bail) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय (Court) काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


महानगरपालिकेच्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी 22 डिसेंबरला एसीबी कार्यालयात सुधाकर बडगुजरांची चौकशी झाली होती. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यावर 10 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. तसेच अटकपूर्व जामिनासाठी बडगुजर यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. 29 डिसेंबरला पोलीस तपासात सहकार्य करण्यासह इतर अटी शर्तीद्वारे बडगुजरांना अटकपूर्व मंजूर झाला होता.


न्यायालय अंतिम निकाल काय देणार?


9 जानेवारीला जामिनाची मुदत संपल्यावर बडगुजर न्यायालयात हजर झाले नाही. बुधवारी झालेल्या सुनावणीत बडगुजर हजर होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अंतिम निकाल राखून ठेवला आहे. आता न्यायालय अंतिम निकाल काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


असा झाला युक्तिवाद


दरम्यान, युक्तिवादात संशयित बडगुजरांनी कंपनीच्या नावे घेतलेले कर्ज, जागा खरेदी, वाहन खरेदी यांच्यासह इतर आर्थिक व्यवहारांची माहिती दिली. विरोधी पक्षातर्फे वकील अविनाश भिडे यांनीही युक्तिवाद केला. दरम्यान, बडगुजरांनी एका सहकारी बँकेतून ४ कोटी पन्नास लाख रुपयांची दोन कर्ज प्रकरणे केली. या कर्जाकरिता त्यांनी अवघे दहा हजार रुपये वेतन असले जामीनदार ठेवल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.


कोण आहेत सुधाकर बडगुजर?


महापालिकेत ठेकेदारपासून ते शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास विलक्षण राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. शिवसेना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे. 


नितेश राणेंनी केला होता बडगुजरांवर आरोप


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नागपूर अधिवेशनात आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितेश राणेंच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली.


आणखी वाचा 


Nashik Crime News : मालेगावला धूम स्टाईलने सुरु होती मोबाईल चोरी; अवघ्या काही तासांतच पोलिसांकडून टोळी जेरबंद