Nashik Crime News: नाशिक : बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी (Approve The Construction Bill) 50 हजारांची लाच (50 Thousand Bribe) मागितली आणि 30 हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. नाशकातील (Nashik News) चांदवडचे (Chandwad) सरपंच (Sarpanch) आणि उपसरपंच (Deputy Sarpanch) लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, गावच्या विकासासाठी ज्यांची निवड करुन दिली, तेच लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे संपूर्ण चांदवडमध्ये खळबळ माजली आहे.
सोग्रस ग्रामपंचायत (Sogras Gram Panchayat) अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्याचं काम तक्रारदाराच्या मित्रानं पूर्ण केलं होतं. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही बिल काही मिळालं नव्हतं. त्या बिलावर सरपंचांची सही आवश्यक होती. हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते. पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सही करण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचांनी कंत्राटदाराकडे पन्नास हजार रूपयांची मागणी केली होती.
नेमकं काय आणि कसं घडलं?
सोग्रस ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याची टाकी पूर्ण केल्यानंतर बांधकाम बिल मंजूर व्हावं, याकरता सरपंचाच्या सहीसाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांना लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलं आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत चांदवड तालुक्यातील मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचं बांधकाम पूर्ण केल्यानंतर या बांधकामाचं बिल न मिळाल्यानं हे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंचांची सही करून पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. मागणी सोग्रस येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी केली होती. त्यानंतर तडजोड झाली आणि शेवटी 50 हजार रुपयांऐवजी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच घेण्याचं ठरलं.
30 हजार रुपये देण्याचा दिवस ठरला, वेळ ठरली आणि इकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. अखेर लाच स्विकारताना सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, सरपंच आणि उपसरपंचांना लाच घेताना लाचलुचपत विभागानं पकडण्याची नाशिक जिल्ह्यातील बहुदा ही पहिलीच वेळ असावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :