Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. शनिवारी भाजपने 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. भाजपच्या (BJP) पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आले नाही. तर राज्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीच्या काही जागांचा तिढा अजून कायम आहे.  


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज रविवारी नाशिक दौऱ्यावर होते.  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर ही बैठक पार पडली. 


जळगावच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता


ठाकरे गटाच्या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जळगावची (Jalgaon Lok Sabha Constituency) जागा ही आपल्या पक्षाला घ्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊतांकडे करण्यात आली आहे. ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता वर्तवली जात असताना जळगावच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जळगावची जागा नक्की कुणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 


संजय राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्त्र   


अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले आणि फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. कृपाशंकर यांच्यावर गैरमार्गाने संपत्ती मिळवली असा आरोप होता, नंतर गृहमंत्री असताना त्यांनीच क्लीन चिट दिली. तुरुंगात न पाठवता तिकीट दिले, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट दिली ही मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांना तुरुंगात न टाकता राज्यसभा दिली ही मोदी गॅरंटी असल्याची टीका त्यांनी केली आहे. 


जळगाव लोकसभेत ठाकरे गटाने डिपॉझिट वाचवून दाखवावं : गुलाबराव पाटील


जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं. डिपॉझिट ते वाचवू शकत नाही. बाकी काय बोलायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


आणखी वाचा 


Kisan Sabha Protest : लाल वादळाचा नाशिकमधील मुक्काम वाढला, आतापर्यंत पाच बैठका निष्फळ, उद्याच्या बैठकीत तोडगा निघणार का?