Kisan Sabha Protest : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Nashik Collector Office) सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज सातवा दिवस आहे. प्रशासनासोबत आतापर्यंत झालेल्या पाच बैठका निष्फळ ठरल्या असून उद्या पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून यात तोडगा निघणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आदिवासी बांधवांना वनपट्टे नावावर करून द्यावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, आशा, अंगणवाडी सेविकांना किमान वेतन द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. 


आंदोलन मागे घेण्याबाबतचा निर्णय उद्या


गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले माकपचे ठिय्या आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर संपण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची पद्धत व गती दोन दिवस लक्षात घेऊ त्यानंतरच सोमवारी हे आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी स्पष्ट केले.


इतिवृत्तात स्पष्टता नाही


काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन हक्काचे प्रश्न हक्काचे प्रश्न तीन महिन्यात तर इतर धोरणात्मक निर्णय प्रधान सचिव विकास खरगे यांनी तीन महिन्यात सोडवण्याचे आदेश दिले होते. या बैठकीतील चर्चेचे इतिवृत्त प्राप्त झाल्यावर आंदोलन मागे घेणार असल्याचे जीवा पांडू गावित यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यांना इतिवृत्त दिले असताना त्यात कार्यपध्दती व कालबध्दतेतील कार्यक्रमाची स्पष्टता नसल्याचे गावित यांनी सांगितले. 


..तर जेलभरो आंदोलनाचा इशारा 


दरम्यान, सोमवारी बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच, या मोर्चात सुमारे 10 हजार बांधव सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासाठीच्या प्राथमिक सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा दिसून येत आहे. या हजारो नागरिकांसाठी ४० सिटचे मोबाईल शौचालय उभारण्यात आलेले आहेत. चार टँकरद्वारे त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आलेली आहे. स्वयंपाकासाठी सरपण, भांडी, धान्य आयोजकांद्वारे पुरवले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Anil Deshmukh : 'माझ्यावरील कारवाईमागे विदर्भाचा मोठा नेता, वेळ आली की...'; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा


Sanjay Raut on BJP Candidate list : भाजपसाठी महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी करणं सोपं नाही, .... संजय राऊतांनी सांगितलं कारण