Jyoti Waghmare नाशिक : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील विविध ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. 


आज मंगळवारी (दि. 12) शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) जोरदार टीका केली.  


हेमंत गोडसे विजयाची हॅटट्रिक करणार


ज्योती वाघमारे म्हणाल्या की, नाशिक म्हणजे रामाची भूमी आहे. जिथे शूर्पणखाचे नाक कापले गेले आहे. कोकण हे शिवसेनेचे ह्रदय तर नाशिक हे नाक आहे. खासदार असूनही एकदम साधा माणूस, कॉल लगेच उचलणारे म्हणजे हेमंत गोडसे आहेत. आप्पा म्हणजे आई आणि पप्पा असे असते. पुन्हा एकदा आप्पा हॅटट्रिक  करून दिल्लीत जावे, अशी आमची इच्छा आहे. 


स्वतःच्या मुलाला मंत्रिपद देणारा मुर्खमंत्री आम्ही बघितला


दादा भुसेंचे केस, दाढी पांढरी आहे. पण त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील पांढरे आहे. आम्ही अडीच वर्ष घरकोंबडा मुख्यमंत्री, कोरोना काळात घरबशा बघितला आहे. स्वतःच्या मुलाला मंत्रिपद देणारा मुर्खमंत्री आम्ही बघितला आहे.  श्रीकांत शिंदे यांनी आदिवासी मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून फिरवतात, हे पेंग्विनला दाखवा, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


बाळासाहेबांचे अयोध्येत राम मंदिर पूर्ण करण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले


शिंदे साहेब मोदींसोबत का गेले? बाळासाहेबांचे अयोध्येत राम मंदिर पूर्ण करण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले, असे म्हणत ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. श्रीराम म्हणणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरे ह****र म्हणतात. सत्तेसाठी तुम्ही रावणाला मुजरा केला. औरंगजेबाच्या कबरीबर गुडघे टेकवले ते शिंदे साहेबांनी केलेले नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


सुधाकर बडगुजर, अद्वय हिरेंवर हल्लाबोल


गया गुजरा तो सुधाकर बडगुजर सलीम कुत्ताच्या बरोबर पार्टीत नाचला, असा त्यांनी एकेरी उल्लेख केला आहे. अद्वय हिरे याला तिकीट देताय त्याने किती लफडी केलीय ? त्याला लाज वाटली पाहिजे. पाकिस्तानची सामना लागला तर बाळासाहेब खेळपट्टी उखडून टाकायचे.  आमच्या सिनेमातील अभिनेत्री कुत्र्यापुढे नाचत नव्हत्या आणि हा उबाठाचा प्रमुख देशद्रोही सोबत नाचत होता, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली आहे.  संजय राऊत यांचा दाऊद म्हणून उल्लेख करत त्यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे आपल्या मुलांना वाचवू शकले नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे राज्यातील मुलांना वाचवता, सलाईन असेल तर सही करतात, असेही ज्योती वाघमारे यावेळी म्हणाल्या. 


आणखी वाचा 


Bacchu Kadu: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंची भाषा बदलली, मविआसोबत चर्चेसाठी तयार, बारामतीमधून विजय शिवतारेंना पाठिंबा