Sanjay Raut on Prakash Ambedkar : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कुठलेही मतभेद नाही, असे संजय राऊत म्हणतात, मात्र संजय राऊत खोटं बोलतात, असा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत कधीच खोटं बोलत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही. मी डॉ. आंबेडकर यांच्या विचारला मानणारा नेता आहे. ते सत्य मानणारे होते, मी सत्य सांगतो. हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावे. संविधान टिकवून ठेवण्यासाठी मी जर बोलत असेल तर यावर माझ्याकडे उत्तर नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर खोटं बोलताय असं मी म्हणणार नाही - संजय राऊत
ते पुढे म्हणाले की, संजय राऊत महाविकास आघाडीतील कोअर कमिटीचे सदस्य आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कुठलाही तिढा नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे. आम्ही त्यांना 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी जी मागणी केली होती त्याच जागा आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर राहायला हवे. प्रकाश आंबेडकर खोटं बोलत आहे असे मी म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना त्या जागा माहिती आहेत.
मी खोटं बोलत नाही - संजय राऊत
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितले की, माझ्या सोबत स्वतः प्रकाश आंबेडकर चर्चेला बसले होते. त्यांचे शिष्टमंडळ वर्षभरापासून माझ्यासोबत चर्चा करत आहे. मी नावे सांगतो, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आम्ही बसलो होतो. मी खोटं बोलत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वंचितला जो प्रस्ताव दिलाय त्यासाठी आम्ही थांबलोय - संजय राऊत
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटपात कोणताही तिढा नाही. जागा वाटप पूर्ण झाले आहे. फक्त वंचितला जो प्रस्ताव दिलाय त्यासाठी आम्ही थांबलो आहोत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या चर्चा होत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा