Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच, दुसरीकडे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) देखील नाशिकमधून (Nashik) निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान, शिवेसेनेच्या मेळाव्यातून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेच (Hemant Godse) उमेदवार असतील अशी घोषणा केल्याने शांतीगिरी महाराजांचा पत्ता कट झाला असून, ते माघार घेतील अशी चर्चा होती. मात्र, आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे शांतीगिरी महाराज यांनी म्हटले आहेत. 


नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न झाले. मागील काळात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने  शांतीगिरी महाराज नाराज झाले होते. तसेच, महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शांतिगिरी महाराज यांच्याकडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालाचली सुरु झाल्या होत्या. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शांतिगिरी महाराज कोणत्या पक्षाकडून रिंगणात उतरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


महायुतीत नाशिकच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच....


महायुतीत नाशिकच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेचसुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे गट आग्रही आहेत. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी नाशिकचे विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यासोबत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील मुंबई गाठत सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत आग्रह करण्यात आला. असे असतानाच आता छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. भुजबळांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून, भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे शांतीगिरी महाराजांच्या भेटीला, नाशिक लोकसभेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता