Shantigiri Maharaj : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) चांगलीच रंगत आणली. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना तगडे आव्हान शांतीगिरी महाराजांनी उभे केले. यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. नाशिकमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे. आता शांतीगिरी महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी अपक्ष लढवली. त्यानंतर शांतीगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी शनिवारी वाराणसीला रवाना होणार आहेत. 


नरेंद्र मोदी माझे राजकारणातील आदर्श - शांतीगिरी महाराज


वाराणसीत आमचा भक्त परिवार आहे, असा दावा शांतीगिरी महाराजांकडून करण्यात आला आहे. वाराणसीत साधू महंतांची भेट घेणार आहोत. नरेंद्र मोदी हे माझे राजकारणातील आदर्श असल्याने मी त्यांच्या प्रचारासाठी जात असल्याची माहिती शांतीगिरी महाराजांनी दिली आहे. यावेळी पत्रकारांनी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? असे विचारले असता भाजपमध्ये जायचे की नाही हे आम्ही निकाला नंतर ठरवू, असे त्यांनी सांगितले. 


शांतीगिरी महाराज घेणार नाशिक पोलीस आयुक्तांची भेट 


दरम्यान, राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढविल्याचा शांतिगिरी महाराजांनी नारा दिला होता. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. पुण्यातील अपघात घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज हे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेणार आहेत. नाशिक शहरातील अवैध धंदे बंद करावे. नाशिक हे धार्मिक शहर असल्याने त्याचे पावित्र्य राखावे, याबाबतचे निवेदन शांतीगिरी महाराज नाशिक पोलीस आयुक्तांना देणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या


मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, मतदान कक्षावर हार घालणं भोवलं