Chitra Wagh :  भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले (Mahatma Phule ) यांच्यासोबत केलीय. घरोघरी सावित्री दिसतात, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. चित्रा वाघ या पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. 


पुणे येथे आज भाजपतर्फे मकरसंक्रांती निमित्त 'सन्मान स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. 


'महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं. चंद्रकांत पाटील हे नेमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे. त्यामुळंच मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे जोतिबा समाजात जास्तीत जास्त तयार होव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.  


उर्फी जावेदचं कौतुक


दरम्यान, याच कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उर्फी जावेदच्या कपड्यांवर देखील भाष्य केलं. त्या म्हणाल्या, 'माझा विरोध कोणत्याही महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हता. माझा विरोध हा विकृतीला होता. परंतु आता कौतुक केलं पाहिजे, कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे. कोण सुधारत असेल तर त्याचं कौतुक पण केलं पाहिजे. तिने काही ठरवलं असेल. कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहे. अलीकडील काळात मला अनेक जण फोटो पाठवत आहेत. त्या फोटोंमध्ये ती चांगले कपडे घातलेली दिसत आहे.  


दरम्यान, याच कार्यक्रमातील चंद्रकांत पाटील यांच्या एका वाक्याची देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 'मला जेव्हा केव्हा सांगतील, तेव्हा मी राजकारणातून संन्यास घेईन आणि सीमेवर जाऊन सैनिकांची भांडी धुण्याची सेवा करेन, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.  


पाहा काय म्हणाल्या चित्रा वाघ