Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जांगांसाठी आज मतदान सुरु असून यावेळी एकही आमदारांचा मत कमी पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. यामुळे आजारी अवस्थेत असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 2008 सालच्या एका घटनेची आठवण या निमित्ताने झाली आहे.
राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता असल्याने एक एक मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला एकही आमदार मागे न राहता प्रत्येकाचं मतदान झालं पाहिजे या ऊद्देशाने राजकीय पक्ष सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी आजरी किनगाव इतर कारणामुळे यायला अडचण असलेल्या आमदारांना स्वतः पक्ष सर्व सुविधा पुरविताना दिसत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत आले असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आजारी अवस्थेत असूनही त्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अशा मतदान प्रक्रियेमुळे 2008 साली अशीच एक मतदान प्रक्रिया समोर आली होती. नाशिक दिंडोरी तत्कालीन खासदार असलेले हरिशचंद्र चव्हाण हे त्यावेळी अपघातात जायबंदी झाले होते. मात्र तरी देखील अपघातात जखमी झालेले हरिश्चंद्र चव्हाण दिल्लीला पोहचले होते. संसदेत अणुकरार संदर्भात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळी भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा अपघात झाला होता. तेव्हा चव्हाण ही रुग्णवाहिकेमधून मतदानाला उपस्थित होते.
दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे. त्याचप्रमाणे अपघातात जखमी झालेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे देखील जायबंदी अवस्थेत होते. मात्र हरिश्चंद चव्हाण यांना पक्षानेखास 'एअर ऍम्ब्युलन्स' मधून दिल्लीला रवाना केले होते.
सहाव्या जागेसाठी शिवसेना भाजपमध्ये चुरस
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक एकमेकांसमोर उभे असून एक-एक मत हे मतत्त्वाचं आहे. शुक्रवारी म्हणजे10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.