Malegaon News : मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या (Malegaon Power Supply Company) गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमवावे लागलेल्या कंपनीचा कर्मचारी नितीन पवार यांना हक्काची मदत मिळावी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकच्या मालेगावमध्ये (Nashik Malegaon News) बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून लक्ष वेधले. 


या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते. पिडीत कर्मचारी नितीन पवारला (Nitin Pawar) भरीव मदत द्यावी, जाचक वाढीव विजबिले कमी करून नागरिकांना न्याय द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पॉवर सप्लाय कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेचे बंडुकाका बच्छाव यांनी दिला.


कंपनीच्या दोषामुळे गमवावे लागले दोन्ही हात


बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव यावेळी म्हणाले की, आजचा मोर्चा मालेगावच्या  पॉवर सप्लाय कंपनी विरोधात काढण्यात आला होता. या कंपनीत नितीन पवार हा हेल्पर म्हणून काम करत होता. त्याला लाईनमनची जबाबदारी देण्यात आली. त्याला कुठलेही सुरक्षेचे साधने पुरवण्यात आले नाहीत. तसेच लेखी परमिट देखील दिले नाही. कंपनीच्या दोषामुळे नितीन पवार याला दोन्ही हात गमवावे लागले आहेत. 


कंपनीची मग्रुरी वाढली


गेल्या वर्षभरापासून कंपनीने त्याला कुठलीही मदत केली नाही. त्याला मदत मिळावी या मागणीसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला. या कंपनीच्या बाबतीत अनेक तक्रारी आल्या आहेत. नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. जनतेला न्याय कोणी देत नाही. कंपनीची मग्रुरी वाढली आहे. ही मग्रुरी कमी करण्यासाठी येणाऱ्या काळात जनेतलाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आम्ही जनतेच्या मागे ठामपणे उभे राहू आणि जनेतला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.


मालेगावात बिबट्या जेरबंद 


मालेगाव शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.  नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये शिरला बिबट्या शिरला होता. यावेळी मोहित विजय आहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला रेस्क्यू केले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Amit Shah : अमित शाहांच्या निशाण्यावर राहुल गांधींपासून महाविकास आघाडी, ठाकरे-पवारांनाही डिवचलं; भाजपचं मांडलं व्हिजन


Lok Sabha Elections 2024 : दिंडोरी लोकसभेची जागा लढवण्यास राष्ट्रवादी सज्ज, भाजपाच्या भारती पवारांचा पत्ता कट?