Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका आहे. 


अमित शाह म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे. 2024 च्या निवडणुकीच्या बाबतीत बोलण्यासाठी मी आलोय. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे. या गैर समजात राहू नका. 2027 ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे. 


उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर डागली तोफ


इंडिया आघाडीतले सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही, तर परिवारवादाच्या पार्टीत आहेत. त्या देशात ते लोकशाही ठेवू शकतील का? उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवारांना (Sharad Pawar) आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


राहुल गांधींवरही टीका


पुलवामामध्ये आतंकवादी आलेत. 10 दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही. 370 कलम 70 वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले. त्यांनी 370 हटविले. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणत होते खून की नदीया येतील. पण खून की नदी सोडा साधा दगड उचलण्याची हिंमत नाही झाली, अशी टीका राहुल गांधींवर केली. 


मोदी गॅरंटी देण्यासाठी आलोय


मोदी गॅरंटी देण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या वेळी सत्ता द्या, जागतिक तिसऱ्या स्थानावर भारताची अर्थव्यवस्था येईल. तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही. पंतप्रधान बनविताना बायोडाटा बघणार की नाही बघणार? 10 वर्षांचा अनुभव आणि पुढील 25 वर्षाचा व्हिजन आहे असा नेता पुन्हा पुन्हा होत नाही. मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेला टेक ऑफ मिळाला आहे. 


पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करतेय


मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजिटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलेंडर 50 हजार लोकांना दिले, गरिबीतून लोकांना बाहेर काढले. नळातून पाणी काढले. पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करते आहे. तुम्ही 5 वर्षाचा आढावा द्या. तिसऱ्या वेळी मोदींना 400 पार खासदार नेण्यासाठी समर्थन करा, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.


सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करताय


राम मंदिर आधी बनायला हवे होते की नाही. काशी कॉरिडॉर बनायला हवे होते की नाही. काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले. काशी कॉरिडॉर आम्ही तयार केले. अयोध्येत राम मंदीर आधीच बनायले हवे होते, वोट बँकच्या भितीमुळे काँग्रेसने केले नाही. विधानसभेसाठी 30 टक्के जागा महिलांना आरक्षित ठेवणार आहे. मोदी सरकारने लस देऊन भारताला कोरोना मुक्त केले. 2030 मध्ये जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल. सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2019 मध्ये लॉन्च झाले नाहीत.


महाविकास आघाडीची पंक्चर रिक्षा महाराष्ट्राला विकास देणार का?


महाविकास आघाडीत 3 टायर पंक्चर आहे, ही पंक्चर रिक्षा महाराष्ट्राला विकास देऊ शकेल का ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. 1 लाख मुलं डॉक्टर बनतील. G20 मध्ये महात्मा गांधी यांच्यासमोर  जगभरातील नेते नतमस्तक होत होते, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Amit Shah: महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांवर हल्लाबोल