President's Police Medal : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज (25 जानेवारी) घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यात नाशिकचे (Nashik) भूमिपुत्र असलेल्या भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांडलकर यांना देखील शौर्यचक्र पदक जाहीर करण्यात आले आहे. 


देशातील  एकूण 901 पोलिसांना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात नाशिकच्या वायुसेनेतील भूमीपुत्राचा समावेश आहे. नाशिक शहराचे भुमीपुत्र भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांडलकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर शौर्यचक्र जाहिर करण्यात आले आहे. 


दरम्यान झारखंडच्या त्रिकृट पर्वतरांगेत झालेल्या रोपवेच्या दुर्घटनेत ३५ पर्यटकांचे प्राण वाचविण्यास कमांडिंग ऑफिसर कॅप्टन योगेश्वर यांच्या पथकाला यश आले होते. तेव्हा ते कोलकाताच्या बारकपुर येथील वायुसेनेच्या केंद्रात कार्यरत होते.


यावेळी झारखंड राज्यातील देवघर येथील त्रिकुट डोंगरावरील रोप-वेची दुर्घटना मागील वर्षी एप्रिल महिन्यात घडली होती. या दुर्घटनेत अनेक प्रवाशी अडकल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अडकलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी भारतीय वायुसेनेचीही आपत्कालीन मदत घेण्यात आली होती. तेव्हा अथक परिश्रमाने 46 लोकांचे प्राण वाचविण्यास बचावकार्य करणाऱ्या पथकांना यश आले होते. यावेळी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे कॅप्टन योगेश्वर यांनी प्राणाची बाजी लावून प्रवाशांना सुखरूप निश्चितस्थळी पोहचवले होते.


दरम्यान कॅप्टन योगेश्वर यांनी केलेल्या अतुलनीय धाडसी बचाव कार्याची दखल घेत त्यांना शाैर्यपदक जाहिर करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी केली. त्यांनी या बचाव मोहिमेत सुमारे 35 पर्यटकांना सुरक्षितरित्या रेस्क्यू केले होते. हे देशातील तीसरे शांतताकालीन शौर्य पदक आहे. बचावकार्य मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन योगेश्वर हे करत होते. यावेळी त्यांच्या पथकाने  हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षितरित्या एअरलिफ्ट केले होते.  ते मुळ नाशिकचे असून त्यांनी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण ओझर टाऊनशिपच्या विद्यालयात घेतले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही ते माजी विद्यार्थी आहेत.


कोणाकोणाला राष्ट्रपती पोलीस पदक?
राज्यातील चार अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.