PM Narendra Modi Kalaram Temple Nashik Visit नाशिक : यंदा 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा (National Youth Festival) बहुमान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी जणू ही एक पर्वणीच आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार तपोवन (Tapovan) येथील मैदानावर होणार आहे. 


या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा निश्चित झाला असून ते नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारी पूजा नेमकी कशी असणार याबाबत एबीपी माझाने माहिती घेतली आहे. जाणून घ्या सविस्तर.


23 मिनिटं पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात (PM Narendra Modi Kalaram Mandir


Nashik Visit)


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे. 


आयुष्यमान हेल्थ कार्डच्या नव्या पॅटर्नची सुरुवात


विशेष म्हणजे देशातील प्रत्येक धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्डचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्या काळाराम मंदिरातून या नव्या पॅटर्नची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


काशी, बनारससारखा विकास व्हावा


काशी, बनारसचा विकास झाला तसा नाशिकचा, इथल्या मंदिराचा विकास व्हावा अशी मागणी पुजाऱ्यांकडून केली जाणार आहे. मंदिराबाहेरच असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यालाही मोदी अभिवादन करणार आहेत, मंदिराकडे जाणारा रस्ता होर्डिंगमय झाल्याचे चित्र आहे.


नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो (PM Narendra Modi road show in Nashik)


नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमळापर्यंत ते असा रोड शो करणार आहेत. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील.


इतर महत्वाच्या बातम्या


PM Narendra Modi Nashik Visit : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकच्या वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कुठले? कोणते रस्ते बंद? जाणून घ्या


Girish Mahajan : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार, भविष्यात अजितदादांना देखील..."; नाशिकमध्ये गिरीश महाजनांचं मोठं विधान