Pankaja Munde :  महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी महामानवाच्या घटनेची काळजी करायची गरज नाही. त्या घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा हल्लाबोल भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काँग्रेसवर (Congres) केला. आज मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून त्या बोलत होत्या.  


पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अरे ही माझी निवडणूक नाही. दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांची निवडणूक आहे, असे त्यांनी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या की, भारती पवारांना दिल्लीत पाठवा ही प्रितम मुंडे (Pritam Munde) यांची विनंती आहे. या देशात सामान्य माणसासाठी झटणारा, गरीबांचा मसीहा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचे आहे. 


भारती पवार यांच्या मागे उभे राहा


मतदारसंघात ४ हजार कोटींचा विकास केला आहे. गरिबांची काळजी घेणारी मोदी सरकार आहेत. मी मंत्री असतांना अनेक योजना मार्गी लावल्या आहेत. महाराष्ट्र गर्जना जेव्हा होते तेव्हा वंचितांचा आवाज बुलंद होतो. शिवरायांनी सर्व मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. बीड जिल्ह्याची निवडणूक मी आताच लढले. आदिवासी समाजातून असलेल्या भारती पवार यांच्या मागे उभे राहा. एका तराजूत मोदींच्या योजना ठेवा व दुसऱ्या बाजूला विरोधकांचे मुद्दे ठेवा विकासाचा तराजू जड दिसेल. 


शेतकऱ्यांसाठी धोरण राबवणार 


सध्या कांदा, शेती पिकांचे मोठे प्रश्न आहेत. माझ्या शेतकऱ्याला कोणाच्या पुढे हात पसरावे लागणार नाही असे धोरण राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याला योग्य भाव दिला तर शेतकरी कायम आपल्या पाठीशी उभे राहतील. अयोध्येत श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाली. नरेंद्र मोदी वंचितांची बाजू मांडत आहेत तेव्हा प्रभू श्रीराम व शिवरायांच्या कामांची आठवण होते आहे. 


तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही


विरोधक भूलथापा देत आहेत. मोदी से डरो असे मुसलमानांना सांगत आहेत. कशा मुळे डरो? दहा वर्षात कुठल्या मुसलमानाच्या केसालाही धक्का लागला नाही. मुसलमांच्या बळकटीकरणासाठी काम करण्यात आले आहे. केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीपासून मुस्लिमांना दूर करण्यासाठी भीती घातली जात आहे. कायद्याची भीती म्हणताय, कुठल्याही कायद्याला बळी पडायचे कारण नाही. तुम्ही सगळे इथलेच आहात, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देते.   


घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत


कुठल्याही वाक्याचा अनर्थ केला जात आहे. संविधान बदलले जाईल, असे बोलले जात आहे. संविधानातील एक शब्द ही बदलण्याची मानसिकता मोदींची नाही. उलट ते संविधान अधिक दृढ करायचे आहे. त्यामुळे महामानवांना ज्यांनी एक निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी महामानवांच्या घटनेची काळजी करायची गरज नाही. त्या घटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशी टीका त्यांनी यावेळी काँग्रेसवर केली. 


आणखी वाचा 


Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला