Nashik Crime नाशिक : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. त्यातच नाशिकमध्ये टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जुने नाशिक (Old Nashik) परिसरात सात ते आठ दुचाकींची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, जुने नाशिक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर तीन जण आले. या तीन अज्ञातांनी सुमारे 7 ते आठ गाड्या पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी चेहरे झाकून हे कृत्य केले आहे. गाड्या जाळपोळची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे.


जाळपोळीच्या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ 


लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गाड्यांच्या जाळपोळीची घटना घडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गावगुंडांचे पोलीस प्रशासनाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.  भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


सिडको परिसरात दोन टोळ्यांमध्ये वाद


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरात मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये वाद उफाळला होता. हा वाद नंतर इतका वाढला की, एकाने गावठी पिस्तुलमधून गोळीबार केला. तर काहींनी तलवार घेऊन दहशत निर्माण केली. यात गोळीचा नेम चुकल्याने एकजण वाचला. मात्र या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) सहा जणांना अटक केली होती. निवडणुकीच्या तोंडावरच नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याने गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


माटुंग्यातील म्हैसूर कॅफेच्या मालकाला लुबाडलं, 'स्पेशल  26' चित्रपटाप्रमाणे सेम टू सेम मोडस ऑपरेंडी, 25 लाखांचा चुना लावला


Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरण, अनुज थापन मृत्यू तपास तातडीने CBI कडे सोपवण्यास हायकोर्टाचा नकार