RBI : आरबीआयकडून (RBI) नाशिक जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव्ह बँक लि. (Padmashree Dr. Vithalrao Vikhe Patil Co-op- Bank Ltd.) व्यवहारावर पुन्हा तीन महिन्यांसाठी निर्बंध आणले आहेत. बॅंकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी निर्बंध वाढवले आहेत. आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयनं आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कलम 35 अ च्या सब-सेक्शन (1) अंतर्गत येणाऱ्या अधिकारांचा वापर करत बॅंकेला आर्थिक स्थिती सुधरवण्याचे सांगितले होते. मात्र आर्थिक स्थिती न स्थिरावल्यानं बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 56 अंतर्गत 19 मे 2018 पासून बॅंकेचा व्यवसाय बंद झाला आहे. बॅंकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी वेळ देण्यात आला मात्र तरी देखील ज्यात पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. 17 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश दिले आहेत.
दरम्यान, बॅंकेवर निर्बंध जरी असले तरी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही त्यामुळे निर्बंधांसोबत बॅंक व्यवहार करु शकते. ज्यात ठेवी काढणे किंवा स्विकारण्यावर बॅंकेला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बॅंक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही. तसेच कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कुणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही, कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत.
बँकेची सध्याची स्थिती पाहता ग्राहकांना बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. बँका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहतील. बँकेवर बंदी असली तरी पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू ठेवतील.
संबंधित बातम्या :