Maharashtra Political Crisis : आज राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर येताना पाहायला मिळत आहे. यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्याचबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कारण अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 30 आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) हे देखील राजभवनावर दाखल झाल्याने राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून छगन भुजबळ हे देखील या मंत्रिमंडळात सहभागी असणार आहे. त्यानुसार छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे. 


दरम्यान, मागील दोन दिवसांच्या घडामोडी बघता अजित पवार यांनी दोन दिवसापासून आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचेही आजचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. त्यानुसार राज्यभरातील अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रातोरात फोन करून सकाळी लवकर मुंबईत पाचारण होण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी बैठक बोलवण्यात आली होती. सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष पदासाठी बैठक असल्याचे सांगण्यात येत होते. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला 30 आमदार उपस्थित होते. त्यानुसार आताच्या शिंदे भाजप सरकारला राष्ट्रवादीच्या एका 30 आमदारांच्या गटाचा पाठिंबा असणार आहे. 


राष्ट्रवादीचा एक गट फुटला...? 


त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे यावरून दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत फक्त आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यांना या बैठकीबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेले छगन भुजबळ हे देखील अजित पवारांच्यासोबत असून त्यासोबत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे देखील शपथ घेणार असल्याचे समजते आहे. मात्र हा सगळा गोंधळ राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे.