Malegaon Akrosh Morcha : मालेगावमध्ये (Malegaon) आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व भाजप आमदार नितेश राणे करणार आहेत. गोरक्षकांवर होणारे हल्ले, धर्मांतर तसेच हिंदू समाजावर होणारा अन्याय हे मुद्दे पुढे करत सकल हिंदू समाजाने या मोर्चाचे आयोजन केलं आहे. तर मुस्लीम समाजाकडून शांती आणि बंधुता पदयात्रा (Shanti Bandhuta Yatra) काढणार आहे. त्यामुळे मालेगावमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात धार्मिक विषयांवरुन आंदोलने (Protest) सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरातील (Malegaon City) म्हसगा महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या नावाखाली मुस्लीम धर्माचा प्रचार करण्याचा कथित प्रयत्न झाल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीसह धर्मांतर बंदी कायदा, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, गोरक्षकांवर होणारे हल्ले, भुईकोट किल्ला येथे वाढणारे अतिक्रमण तसेच हिंदू राष्ट्र निर्मिती आदी विषयांवर कायदे व्हावे, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मालेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे नेते आणि पदाधिकारी मालेगावात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबत तैनात करण्यात आला आहे. 


आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांचं नेतृत्वात हा हिंदू जण आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. याचबरोबर हजारो हिंदू बांधव सहभागी असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने मालेगाव शहराला जणू छावणीचं रुप आले आहे. आरसीपी, एसआरपीएफ यांच्यासह पोलिसांचं बंदोबस्त तैनात असणार आहेत. मालेगाव शहरातील रामसेतू पूल ते म्हसगा महाविद्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहेत. म्हसगा महाविद्यालय म्हणजे हे तेच महाविद्यालय आहे, जिथे काही दिवसांपूर्वीच धर्मांतराच्या आरोपाखाली हिंदू संघटनाने आक्षेप घेतला होता. त्याबाबत गुन्हा देखील दाखल झाला होता. 


मुस्लीम समाजाकडून शांती बंधुता मोर्चा 


विशेष म्हणजे या मोर्चानंतर मुस्लीम संघटनांनी देखील मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. शांतता व बंधुता असं या मोर्चाला त्यांनी नाव दिलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच आज मालेगावकडे सगळ्यांचं लक्ष हे असणार आहेत. हिंदू जनआक्रोश मोर्चा आज दुपारी बारा वाजेपर्यंत निघणार असून त्यानंतर मुस्लीम समाजाकडून शांती आणि बंधुता या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. 


हेही वाचा


Malegaon : मालेगावात 2 जुलैला 'हिंदू जनआक्रोश मोर्चा',नितेश राणे, मिलिंद एकबोटे मोर्चात सहभागी होणार