National Youth Festival नाशिक : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा (National Youth Festival) बहुमान यंदा नाशिकला (Nashik News) मिळाला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. यंदाच्या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


तपोवन मैदानावर (Tapovan Maidan) आयोजित नीती मोहन (Neeti Mohan) यांच्या संगीत मैफलीचा शेकडो युवक-युवतींनी आनंद लुटला. गायिका नीती मोहन यांच्या सुमधूर आवाजाने तरुणाईची मने जिंकली. अनेक गाण्यांवर तरुणांनी उत्स्फूर्तपणे ठेकाही धरल्याचे दिसून आले. 'स्टुडंट ऑफ द इयर’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी 'जब तक है जान', 'मैं तेरा हिरो', 'पद्मावत', 'हॅपी न्यू इयर', 'साहो', 'कलंक', 'गंगूबाई काठियावाडी' यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी गायली.


नाशिकच्या भूमीला सलाम


युवा महोत्सवातील गाण्यांच्या सादरीकरणानंतर गायिका नीती मोहन शर्मा म्हणाल्या की, “आपल्या देशाची ताकद तरुणाई आहे. मला या महोत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशातील तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे राष्ट्रीय युवा महोत्सवात येऊन मला खूप आनंद वाटला. तरूणांनी मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा, नाशिक ही पवित्र भूमी आहे, या भूमीला सलाम आहे. या ठिकाणी एक जादू असून, येथील पाणी, मंदिर, फळे, फुले, भाज्या आणि लोकांसह सर्वकाही खूप सुंदर आहे. 


नाशकात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


लोक नृत्य (Folk Dance) ग्रुप आणि सोलो
ठिकाण : महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
दि. : 13 ते 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी  9.30 सुरुवात होणार आहे. 1.30 ते 2.30 पर्यंत जेवणाची सुट्टी असेल. त्यानंतर कार्यक्रम 2.30 to 6.30 वाजेपर्यंत सुरु राहील.


फोटोग्राफी स्पर्धा (Photography Competition)
ठिकाण : महाकवी कालिदास कलामंदिर, हॉल क्रमांक  1, नाशिक.
दि. : 14 ते 15 जानेवारी 2024
वेळ :  सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होईल. 1.30 ते 2.30 जेवणाची सुट्टी असेल. 2.30 ते 6.30 कार्यक्रम सुरु राहणार आहे. 
 
घोषणा आणि थीमॅटिक आधारित सादरीकरण (Declamation & thematic based presentation)
ठिकाण :  महाकवी कालिदास कलामंदिर, हॉल क्रमांक  2, नाशिक.
दि. : 14 ते 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 9.30 पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 1.30 ते 2.30 पर्यंत जेवणाची सुट्टी असेल. 6.30 पर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहे. 


लोकगीते गट आणि सोलो (Folk Song Group & Solo)


ठिकाण : रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक
दि. : 13 ते 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30, 1.30 te  2.30 जेवणाची सुट्टी असेल.


तरुण कलाकार शिबीर, पोस्टर बनवणे, कथा लेखन, (Young Artist Camp Poster Making Story Writing)
ठिकाण : उधोजी महाराज संग्रहालय
दि. : 13 ते 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 9.30 ते 6.30,  1.30 te  2.30 जेवणाची सुट्टी असेल.


सुविचार (Suvichar)
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 13 ते 14 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 10 to 11.30, आणि  11.45 to 1.15 pm पर्यंत हा कार्यकम सुरु राहणार आहे.


युवा संमेलन (Youth Convention)
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 10 ते 11.30, आणि 11.45 to 1.15. 


युवा कृती (YUVA KRITI)
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 12 जानेवारीपासून 2024 सुरु.
वेळ : सकाळी १०. 


खाद्य महोत्सव (Food Festival)
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 12 जानेवारीपासून 2024 सुरु.
वेळ : सकाळी १०. 


महाराष्ट्र युथ एक्स्पो (Maharashtra Youth Expo) 
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 12 जानेवारीपासून 2024 सुरु.
वेळ : सकाळी १०. 


सांस्कृतिक रात्र (Cultural night)
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 12 जानेवारीपासून 2024 सुरु.
वेळ : सायंकाळी 6 वाजेपासून 


ऍडव्हेंचर कार्यक्रम (Adventure Program)
ठिकाण : अंजनेरी, ठक्कर डोम, बोट क्लब, चांभार लेणी. 
दि. : 13 ते 15 जानेवारी 2024
वेळ : सकाळी 11 ते सायंकाळी 5. 


स्वदेशी खेळ (Indigenous Games) 
ठिकाण : महायुवा ग्राम, हनुमान नगर, नाशिक.
दि. : 13 ते 15 जानेवारी 2024
वेळ : दुपारी 2.30 ते सायंकाळी 5. 


आणखी वाचा 


National Youth Festival : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, नाशिकचा राष्ट्रीय युवा महोत्सव नेमका काय?