National Youth Festival नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान यंदा नाशिकला (National Youth Festival Nashik) मिळाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या सोहळ्याचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात उद्घाटन (Inauguration) पार पडले. मात्र युवा दिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार (Awards) न मिळाल्याने 15 पुरस्कारार्थी बहिष्काराच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळत आहे. 


ज्या युवकांसाठी हा महोत्सव होत आहे, त्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनाच युवादिनी राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण न झाल्यामुळे पुरस्कारार्थींकडून संताप व्यक्त होत आहे. उशिरा होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


युवा दिनी पुरस्कारांच्या वितरणाची अपेक्षा


केंद्र सरकारकडून (Central Government) दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्कारांनी (National Youth Awards) सन्मानित केले जाते. अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती अथवा पंतप्रधान यांच्या हस्ते करण्याचा पायंडा आहे. त्यामुळे यंदा नाशिक (Nashik) येथे सुरू असलेल्या युवा महोत्सवात या देशातील युवा पुरस्कारार्थींना राष्ट्रीय युवा महोत्सवात युवादिनी पुरस्कारांचे वितरण होईल अशी अपेक्षा होती. 


पुरस्कारार्थींनी युवा महोत्सवाकडे फिरवली पाठ


या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व केंद्र व राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत झाले. मात्र, या सोहळ्यात पुरस्कार वितरणाबाबत आयोजकांनी कोणतीही भूमिका न घेतल्याने या पुरस्कारार्थींनी युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. 


केंद्रीय युवा कल्याण मंत्रालयाच्या संचालकांनी घेतली पुरस्कारार्थींची भेट


या पुरस्कारार्थींनी पंतप्रधानांच्या सभेकडे पाठ फिरवल्याचे लक्षात येताच राज्याच्या आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पुरस्कारार्थींची भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. केंद्रीय युवा कल्याण मंत्रालयाच्या संचालक वनिता सूद यांनी १५ पुरस्कारार्थींची शनिवारी भेट घेतली आहे. 


रविवारी होणार चर्चा


त्यांनी युवाग्राम येथे उपस्थित असलेल्या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक यांची भेट घेऊन त्यांना पुरस्कारार्थींच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावर केंद्रीय मंत्र्यांनी चर्चेसाठी रविवारची वेळ दिली असल्याचे समजते. 


इतर महत्वाच्या बातम्या