येवला, नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यातील वाकयुद्ध काही केल्या संपत नसल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर हल्लाबोल केलाय. जशी संस्कृती तशीच टीका केली जाते, असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका केली. ज्याचे जसे शिक्षण, संस्कृती जशी जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील, असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्र डागलं. 


आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण ओबीसीमधूनच आरक्षण हवं असा हट्टा का, असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर भर दिल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी केलीये. पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाकडून सातत्त्याने विरोध करण्यात येतोय. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामधील टीकेचं सत्र काही केल्या संपत नाहीये. 


माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे - छगन भुजबळ


जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे जसे शिक्षण, संस्कृती असते तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील. टीका करायला चांगले शब्द सापडतात नाही. चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील.  माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे. थोड शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. दोनशे बेकायदेशीर पिस्तूलांची आयात जालना जिल्ह्यात झालीये. काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसेच शिकणार, छगन भुजबळांनी म्हटलं. 


शेवटी काही केलं तरी कोर्टात जाणारच - छगन भुजबळ


सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेव्टीव्ह पिटीशनवर देखील भुजबळांनी भाष्य केलं आहे. यावर त्यांनी म्हटलं की, शेवटी काही केलं तरी कोर्टात जाणारच. एखाद्या समाजाला किंवा घटकाला चुकीचं वाटल तर कोर्टात जाणारच ना. ओबीसींना आरक्षण मिळाले ते मंडल आयोगाने दिले.व्हीं.पी.सिंग यांनी मान्य केले.त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांनी ते मान्य केलं. शेवटी न्यायाधीशांसमोर गेले त्यात महाराष्ट्रातील न्यायाधीश पी.बी.सावंत ही होते.तिथे त्यांना योग्य वाटलं मग त्यांनी लागू करा सांगितल मग ते लागू झालं. 


'आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला का?'


आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह सगळ्याच राजकीय नेत्यांचं हेच म्हणणं आहे. शेड्युल ट्राईब आणि  शेड्युल कास्टवाले कोणाला मध्ये घेतात का ? असा सवाल देखील यावेळी भुजबळांनी उपस्थित केलाय. 374 जाती आहेत आणि ओबीसीमध्ये 54 टक्के आरक्षण आहे. मराठा समाज त्यात आला तर त्यामधील इतर छोट्या जातींवर अन्याय होईल. ओबीसीमधील अनेक छोट्या जाती गरीब आहेत. 27 टक्के मागतोय, अजून 10 टक्के पण मिळालं नाहीये, अशी जळजळीत टीका छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केलीये. 


हे आले तर कोणालाच काहीच मिळणार नाही - छगन भुजबळ


हे जर ओबीसींमध्ये आले तर कोणालाच काहीच मिळणार नाही. आरक्षण त्यांना मिळालेच, थोडी अडचण आहे. पण तीही दूर होईल. पण ओबीसीतूनच आरक्षण हवे असा अट्टाहास का? असा सावल यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. सरकारने जरी हा अट्टाहास पूर्ण केला, तर ओबीसी पण नाराज होतील. मराठा समाज मतदान करणार नाही म्हणता, पण जर ओबसींवर अन्याय झाला तर तेही मतदान करणार नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


माझा जरांगेंना सपोर्ट! सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो; भुजबळांचा उपरोधिक टोला