मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड (New Saptshrungi Devi) 31 डिसेंबर रोजी 24 तास खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार असल्याचं विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. दरवर्षी नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक सप्तशृंगगडवरील श्री भगवतीच्या दर्शनाने करतात.


तसेच नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर  सप्तशृंगगड येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते. त्यातच शनिवार - रविवार आलेली सुट्टी आणि शाळेला असलेल्या नाताळच्या सुट्ट्यांमुळेही  नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवतीचे  दर्शन घेता यावे यासाठी श्री भगवती मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आलीये. 


सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील सर्व मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं. नव वर्षाचे स्वागत हे देवी देवतांच्या आशिर्वादाने व्हावेत अशी इच्छा सर्वसाधारणपणे लोकांची असते. त्यासाठी अनेक जण राज्यातील अनेक मंदिरांमध्ये देखील जातात. अशात प्रसन्न वातावरणात भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी भाविक – भक्तांसाठी श्री भगवती मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. 


विशेष म्हणजे सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या नियमित वेळेप्रमाणे सर्व काही होईल. दरम्यान भाविकांना काही प्रमाणात नियमांचे देखील पालन करावे लागणार आहे. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून देखील काही उपाययोजना करण्यात 


हेही वाचा : 


Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी निवडणूक जिंकली, आता भाजपच्या तिकिटावर उभ्या राहणार?