मालेगाव, नाशिक : नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegoan) शहरात  सटाणा नाका परिसरातील बँक कॉलनीत सशस्र दरोड्याचा प्रयत्न काही जणांनी केला. पण हा नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. तीन सशस्त्र दरोडेखोरांनी इंदिरा नक्षत्र या इमारतीत पटेल नामक व्यापाऱ्याच्या घरात घुसून चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून जबरी लुट करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये कुटुंबातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचवेळी पटेल कुटुंबियांनी आरडा ओरडा केल्याने या चोरांनी तिथून पळ काढला. 


ज्यावेळी या हल्लेखोरांनी पळण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी काही तरुणांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडलं. या हल्लेखोरांना चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवार रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  दरम्यान, घटनास्थळाजवळच निवासस्थान असलेल्या  मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी पटेल कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि स्थानिक पोलीस स्थानकात जाऊन घटनेतील दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील केली. 


नेमकं काय घडलं?


नाशिकमधील सटाणा नाका भागात इंदिरा नक्षत्र पार्क ही सोळा सदनिका असलेली इमारत आहे. या इमारतीत अंगडिया व्यापारी अमृत पटेल यांच्या घरावर तिघांनी सशस्र हल्लेखोरांनी प्रवेश केला. संशयितांकडे गावठी बंदूक, चाकू आणि अन्य शस्र होती. त्यावेळी पटेल हे नेमके दुकानातून घरी आले होते. त्यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय त्यांना आहे. घरात घुसताच त्यांनी चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली पिशवी पळविण्याचा प्रयत्न केला. 


या दरोडेखोरांनी पटेल कुटुंबियांवर चाकूने हल्ला देखील केला. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी देखील त्यांना विरोध केला. संशयितांनी अमृत पटेल यांच्यासह तिघांवर चाकून हल्ला वार केल्याची घटना घडली. यामध्ये कुटुंबातील एकजण गंभीर जखमी झाला. ही सगळी परिस्थिती पाहून पटेल यांच्या कुटुंबियांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हा आरडा ओरडा ऐकून स्थानक रहिवाशी त्यांच्या मदतीला धावले आणि त्या दोघा संशयितांना पाठलाग करत असताना पकडले. या दरोडेखोरांना आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेही वाचा : 


Nashik Crime: 50 हजार मागितले, पण 30 हजारांत डिल पक्की; नाशकात सरपंच, उपसरपंचांना रंगेहात पकडलं