नाशिक : नाशिककर (Nashik) पावसाची आतुरतेने वाट बघत असतानाच गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाले असून नाशिक शहरात तर सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळते आहे. गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने आज दुपारी 1 वाजता 500 क्युसेसने  पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह (Nashik Rain) जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत होता. अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक शेतीपिकांना फटका बसला. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरूवारी सकाळपासून नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक भागातही पावसाने जोरदार कमबॅक केल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, गंगापूर पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजेपासून गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 500 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत रात्रीपासून पावसाचा (Rain) जोर वाढला असून धरणांच्या (Dam) पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणीच पाणी साचले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. एकंदरीतच नाशिककर आता सुखावले असून पाऊस असाच बरसावा आणि धरणे तुडुंब भरावीत अशीच अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत. काल रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुनरागमन केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच, काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. अशातच गंगापूर धरण (Water Discharged) क्षेत्रात संततधार चालू असून पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून दुपारी 1 वाजता 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


पुढील दोन दिवस यलो अलर्ट 


नाशिक जिल्ह्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यंत हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow Alert) दर्शविण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचे असणार असून गुरुवारी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला होता. शुक्रवार आणि शनिवारीदेखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरवात केल्यानंतर आज सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Rain : दिलासा! नाशिकसह जिल्ह्यात पावसाचे दमदार कमबॅक, रात्रीपासून जोरदार, शेतीपिकांना जीवदान