मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या व खान्देशसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या (Girna Dam) पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 87.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरण 100 टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून कोणत्याही क्षणी पाण्यातून विसर्ग सुरु करण्याची शक्यता आहे. 


धरणातून कोणत्याही क्षणी पाणी विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याने गिरणा नदीकाठच्या (Girna River) लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गिरणा धरणात 35 ते 40 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग येत आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव (Malegaon), नांदगाव (Nandgaon), चाळीसगाव (Chalisgaon) तसेच ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर खान्देश शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 


गिरणा धरण फुल्ल होण्याचा मार्गावर


गिरणा खोऱ्यात व पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कसमा पट्ट्यातील धरणे भरलेली असल्याने नांदगाव तालुक्यातील गिरणाडॅम धरणात 35 हजार ते 40 हजार क्यूसेक पाणी आवक सुरु आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी गिरणा धरण 100 टक्के भरू शकते. यामुळे खबरदारी म्हणून गिरणा नदी काढच्या गावांना सुरक्षितेच्या दृष्टीने नदीपात्रात पाणी सोडण्याचा अगोदर पूर्वसूचना देण्यात याव्यात. सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभागाने दिले आहे.


पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला 


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यासह नदीकाठचे गावे गिरणा नदीवर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी टंचाई निर्माण झाली होती. उष्णतेची तीव्र दाहकता लक्षात घेता, या गावांना पिण्याची, पाणीटंचाई जाणू लागली. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागली होती. आता चांगला पाऊस बरसला असल्याने  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला तर खान्देश शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 


मागील वर्षी गिरणा धरणात 57 टक्के पाणीसाठा


दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिका, नांदगाव शहर, 56 खेडी योजना, न्यायडोंगरी तसेच जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव, तालुक्यातील गावे व पाचोरा, भडगाव, जीवन प्राधिकरणाच्या दोन योजना एरंडोल तालुक्यातील 154 गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. मागील वर्षी पावसाळा ऋतूत कमी प्रमाणात पाऊस पडला होता. कळवण पट्ट्यातील मोसम नदी खोऱ्यातील पडलेला पावसाने गिरणा धरण जेमतेम 57 टक्के पर्यंत भरले होते. 52 वर्षात एकूण 12 वेळा गिरणा धरण भरले आहे. त्यात सलग चार वर्षे ओव्हरफ्लो झाले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Rain Update : गोदामाईचा नारोशंकराला जलाभिषेक, नाशकात पावसाची संततधार कायम, दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी?