नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस (Nashik Rain Update) सुरू होता. त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला (Godavari River) यंदाच्या हंगामातील पहिला पूर आल्याचे दिसून आले. मात्र आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) गोदापात्रात सुरू असलेल्या विसर्ग कमी करण्यात आला आहे. 


जिल्ह्यात छोट्या-मोठ्या धरणांमधून देखील पाण्याचे विसर्ग सुरु होता. मात्र, सध्या पावसाच्या विश्रांतीनंतर धरणातील विसर्ग कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास 73 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून नाशिक जिल्ह्याला दोन महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने मात्र नाशिककर यांची तहान काही प्रमाणात भगवल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. सध्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे रामकुंड परिसरातील पूर देखील ओसरत आहे. 


गंगापूरमधून विसर्ग कमी


गंगापूर धरण्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने गोदावरी नदीत होणारा पाण्याचा विसर्ग सकाळ पासून टप्याटप्याने कमी करण्यात आला आहे. काल 8 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यानंतर विसर्ग 4 हजार क्युसेकने कमी करण्यात आला. आज सकाळी 10 वाजेपासून गंगापूर धरणातून 2 हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत घट होत आहे. 


कोणत्या धरणात किती पाणीसाठा?  


गंगापूर – 85.86 टक्के, कश्यपी – 51.03 टक्के, गौतमी गोदावरी 87.26 टक्के, आळंदी 74.63 टक्के, पालखेड – 63.86 टक्के, करंजवण – 55.93 टक्के, वाघाड 72.81 टक्के, ओझरखेड 33.10 टक्के, पुणेगाव 76.08 टक्के, तिसगाव 6.37 टक्के, दारणा – 84.26 टक्के, भावली - 100 टक्के, मुकणे - 52.84 टक्के, वालदेवी - 100 टक्के, कडवा 81.58 टक्के, नांदुरमध्यमेश्वर- 00 टक्के, भोजापूर - 96.68 टक्के, चणकापूर - 74.82 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, नागासाक्या 00 टक्के, गिरणा 26.01 टक्के, पुनद 50.08 टक्के, माणिकपुंज 00 टक्के.


तालुकानिहाय पावसाची आकडेवारी 


मालेगाव 294.6, बागलाण 290.6, कळवण 255.1, नांदगाव 292, सुरगाणा 752.6, नाशिक 224.4, दिंडोरी 447.3, इगतपुरी 854.2, पेठ 772.0, निफाड 252.6, सिन्नर 289.4, येवला 287.3, चांदवड 362.4, त्र्यंबकेश्‍वर 1197.9, देवळा 310.8. 


सटाण्याचे केळझर धरण ओव्हरफ्लो


नाशिक जिल्ह्यातील  बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे केळझर धरण ओसंडून वाहू लागले आहे. बागलाण तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनाखाली आणण्यात केळझर धरणाच्या डांगसौंदाणे पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतो. केळझर धरण भरल्याने आरम खोऱ्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 


आणखी वाचा 


Girna River Rescue : गिरणा नदीत अडकलेल्या मासेमारांची अखेर सुटका, तरुणाने सांगितला संपूर्ण घटनेचा थरार