Nashik Political News: नाशिकच्या ठाकरे गटातून (Uddhav Thackeray Party) नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhari) यांनी सर्वांनाच बुचकळ्यात पाडले होते. शिंदे गटात (Shinde Group) त्यांना महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून महाराष्ट्राचे (Maharashtra News) महत्वाचे पद त्यांच्या सोपविण्यात आले आहे.


नाशिकच्या (Nashik Politics) राजकारणात (Political News) एकावर एक ट्विस्ट येत असून यात ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) सातत्यानं धक्के सहन करावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांच्या जथ्यानं शिंदे गटात एन्ट्री करत ठाकरे गटाला खिळखिळं केलं. याच सुमारास संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यानंतर हा मोठा बॉम्ब फुटला.  नगरसेवकांच्या प्रवेशानंतर लागलीच नाशिकचे संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. याच भाऊसाहेब चौधरी यांना शिंदे गटात मोठे गिफ्ट मिळाले आहे. चौधरी यांना शिंदे गटाचे महाराष्ट्र सचिव पद बहाल करण्यात आले आहे.


भाऊसाहेब चौधरी यांची बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) अर्थात शिंदे गटात महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांची नियुक्ती केली असून शिंदे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. तर त्यांचे नियुक्ती पत्र देतांनाच एक फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. भाऊसाहेब चौधरी यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना शिंदे गटात मोठं पद मिळणार याबाबतची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. 


विशेष म्हणजे, ठाकरे गटात त्यांच्याकडे संपर्क प्रमुख हे विशेष पद होते. त्याचबरोबर संजय राऊत यांच्याबरोबर त्यांचे निकटचे संबंध होते. मात्र अचानक काही दिवसांपूर्वी 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनतर दोनच दिवसांनी चौधरी यांनी ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच रात्री त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ होत असून शिंदे गट ठाकरे गटाला भारी पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शिंदे गटात इंकमिंग सुरू झाल्याने ठाकरे गटाला सुरुंग फोडण्यात शिंदे यश आल्याचे मानले जात आहे.


राऊतांची पाठ फिरताच नगरसेवक शिंदे गटात 


नाशिक ठाकरे गटाशी सख्य राखून असलेले संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल रोखलं. मात्र काही दिवसांपासून ठाकरे गटात अस्वस्थता होती. काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊतांनी नाशिक दौरा केल्यानंतर ही चर्चा काही काळ थांबलेली होती. त्यानंतर काल परवाच संजय राऊत हे पुन्हा दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांशी बैठका घेत विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेले अजय बोरस्ते यांची भेट घेत वैयक्तिक चर्चा केली होती. मात्र संजय राऊत माघारी फिरताच प्रवेशाच्या हालचाली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटलं जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Shivsena : दोन दिवसांपूर्वी राऊतांबरोबर जेवण केलं अन् आज शिंदे गटात पसार झाले....नाशिकमध्ये ठाकरे गट संतप्त