Nashik Flower Festival नाशिक : नाशिककरांचे लक्ष लागून राहिलेल्या पुष्पोत्सवाचे सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी हजारो नाशिककरांनी पुष्पोत्सवातील (Nashik Flower Festival) विविध प्रजातीची फूले पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. यावेळी केतकीने प्रसिद्ध मला वेड लागले प्रेमाचे गीत सादर करत उपस्थित नाशिककरांची दाद मिळवली. 


उद्घाटनाला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील, पाणीपुरवठा अधिकारी संजय अग्रवाल, अविनाश धनाईत, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 


केतकीने नाशिकला दिली मोगऱ्याची उपमा 


नाशिककरांमध्ये प्रेम-जिव्हाळा आहे. अंकुश चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला नाशिकमध्ये महिनाभर राहण्याची संधी मिळाली. या वेळी मी नाशिकरांचे प्रेम अनुभवल्याचे सांगितले. आर.जे. प्रथम याने केतकीला विचारलेल्या प्रश्नांना तिने दिलखुलास उत्तरे दिली. तसेच नाशिक शहर फुल असते, तर मी नाशिकला मोगऱ्याची उपमा दिली असती, या शब्दांत तिने नाशिकबद्दल प्रेम व्यक्त केले. 


पुष्पोत्सवासाठी 1797 प्रवेशिका प्राप्त


यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी यांनी पुष्पोत्सव घेण्याबाबतचा उद्देश सांगितला. सेल्फि पॉईट अन संगीत मैफील पुष्पोत्सवासाठी विविध गटात स्पर्धकांमार्फत 1797 प्रवेशिका प्राप्त झाल्या. या प्रदर्शनात 42 नर्सरी स्टॉल आणि 20 फुड स्टॉल्स लावण्यात आले आहे. महापालिका मुख्यालय इमारतीच्या तीनही मजल्यावर विविध गटांची मांडणी आकर्षक पद्धतीने मांडणी केली आहे. यात गुलाबपुष्प, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.  प्रवेशव्दारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली असून प्रांगणात सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग करण्यात आले आहे. पुष्प स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटींग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी स्वरसंगीत हा कार्यक्रम रंगला. यावेळी गायकांनी विविध गाणी सादर केली.


खालील विजेत्यांचा झाला सन्मान


प्रथम विजेत्यांना बक्षिस सर्वोत्कृष्ट नर्सरी : पपाया नर्सरी,
कुंड्यांची शोभिवंत रचान : प्रसाद नर्सरी,
सर्वोत्तम बोन्साय : विनायक शिवाजी शिंदे,
ताज्या फुलांची रचना : स्वप्नाली जडे,
जपानी पुष्परचना : स्वप्नाली जडे,
पुष्प रांगोळी : पंकजा जोशी,
सर्र्वोत्तम परिसर प्रतिकृती : प्रसाद नर्सरी,
सर्वात्कृष्ठ तबक उद्यान : ज्योती अरूण पाटील,
परिसर कृतीमध्ये नाशिक पूर्व विभाग प्रथम,
गुलाबराणी : माधुरी हेमंत धात्रक,
गुलाब राजा : आरूष सोनू काठे.


आणखी वाचा 


नाशिकचं राजकीय वातावरण तापलं, फडणवीसांचा आज दौरा, भाजपा करणार नाशिक लोकसभेवर दावा