Nashik News नाशिक : सर्वत्र नववर्षाचा (New Year 2024) आनंदोत्सव साजरा होत असताना नाशिकमध्ये (Nashik) एक दुर्दैवी घटना घडली होती. इंदिरानगर (Indiranagar) परिसरात सोमवारी गॅस गळतीमुळे (Gas Leakage) भीषण स्फोट झाला होता. यात दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात दोघेही ६० ते ७० टक्के भाजल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


इंदिरानगर परिसरातील कलानगर चौकात वक्रतुंड पार्सल पॉईंट (Vakratund Parcel Point) या दुकानात गॅसगळतीमुळे भीषण स्फोट झाला होता. इंदिरानगर येथील कलानगर चौकात सिग्नललगत वक्रतुंड पार्सल पॉईंट दुकान आहे. या दुकानाचे चालक सुरेश नारायण लहामगे (५५, रा. वंदना पार्क, इंदिरानगर) हे ३१ डिसेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. 


लाइटचे बटन सुरू करताच आगीचा भडका


दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला सकाळी नऊ वाजता लहामगे व संदीप कालेकर हे दोघे किराणा माल घेऊन दुकानात आले होते. यावेळी शटर उघडून लाइटचे बटन सुरू करताच अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे आगीत दोघेही गंभीर भाजले होते. गुरुवारी उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दोन महिन्यांपूर्वीही नाशकात गॅस गळतीमुळे स्फोट


दोन महिन्यांपूर्वी उत्तमनगर (Uttamnagar) परिसरातील तुळजा निवास येथे भीषण स्फोट झाला होता. या घटनेत घरातील दोन पुरुष आणि एक महिला गंभीररित्या भाजले होते. हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडरच्या स्फोटासारखा आवाज होऊन परिसर हादरून गेला होता. 


स्फोट झालेल्या घराबाहेर काही अंतरावरील दोन चारचाकी वाहनांच्याही काचा फुटल्या होत्या तर घरात दोन मोबाईल (Mobile), परफ्युम बॉटल आणि ईतर कॉस्मेटिक साहित्य त्यांना जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला असावा किंवा अल्कोहोलिक परफ्युमला आग लागल्याने ती भडकली असावी अशी परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या


Anil Patil on Eknath Khadse :आता फोन टॅपिंग अधिकृतरित्या होईल, खडसेंचा वार, तर फोन टॅपिंगला खडसे का घाबरतात ? अनिल पाटलांचा सवाल