नाशिक : फोन टॅपिंगला खडसे का घाबरतात ? असा सवाल विचारत मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) पलटवार केलाय. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलीये. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचं नाव पुढे आलं होतं. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडलं. फोन टॅपिंग आता अधिकृत होतील असं म्हणत खडसेंनी या मुद्द्यावर थेट वार केला. खडसेंच्या या वाराला अनिल पाटलांनी पलटवार केलाय. 


अनिल पाटलांनी काय म्हटलं?


रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली त्याचा आणि राखीचा काहीही संबंध नाही. शेवटी ते भावनिक नातं असतं, कोणी कोणाला राखी बांधतं. हे भावनिक नातं आहे, ते कसं जपावं ते आपल्यावर अवलंबून असतं. फोन टॅपिंगला खडसे का घाबरतात असा सवाल विचारत कुठे ना कुठे काळाबाजार अशी शंका आहे का असा प्रश्न देखील मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थित केलाय. 


एकनाथ खडसेंनी काय म्हटलं होतं?


रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना राखी बांधली. एका प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट आहे. विरोधकांनी आता सावध राहायला हवं. आता अधिकृतपणे फोन टॅप होतील अशी टीका देखील खडसेंनी केलीये.  राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे खडसे यांनी म्हटलं. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, राज्यात महिला सुरक्षित नाहीत. आता रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षेवर लक्ष द्यायला हवं अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. 


पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती 


 आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलीस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. 


हेही वाचा : 


Loksabha Election 2024 : रत्नागिरी- सिंधुदुर्गचा मतदारसंघ, शिंदे गट किरण सामंतांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, उमेदवार भाजपचा असणार, नारायण राणेंचा दावा