धक्कादायक! मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले, जीव गमावून बसले, नाशिकच्या कजवा़डे धरणात बुडून तिघांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे सातवडे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे सातवडे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. भूषण रघुनाथ कर्नर (वय 13), हरी बाबू गोयेकर (वय 28) आणि बाबू घुटा गोयेकर (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे कजवाडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी तसेच धुण्यासाठी सातवडे धरणावर गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास भूषण कर्नर याला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी हरी गोयेकर हे पाण्यात उतरले. मात्र, तेही पाण्यात बुडाले. ही घटना लक्षात आल्यानंतर मदतीसाठी गेलेले बाबू गोयेकर हेही पाण्यात बुडाले. काही वेळातच तिघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव ट्रकने 35 वर्षीय तरुणाला चिरडले, गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथील घटना
गोंदिया बालाघाट महामार्गावरील नागरा येथे भरधाव ट्रकने एका 35 वर्षीय तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. लोकेश बघेले असे मृतक तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर नागरा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला आहे.. सध्या या महामार्गाचे बांधकाम सुरू असून बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था न केल्यामुळे यापूर्वी झालेल्या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला आणि आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून बांधकाम करणाऱ्या कंपनीचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावे अन्यथा हा आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.






















