North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभराच्या ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे मार्च महिन्यात नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते नाशिकला येणार आहेत. राहुल गांधींच्या स्वागताची नाशिक काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु आहे.
वितरिका क्रमांक ४६ ते ५२ ला पालखेड डावा कालव्याचे शेतीसिंचनासाठी पाणी सोडावे, यासाठी शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी दुसऱ्या दिवशी उपोषणस्थळाकडे फिरकला नाही. सुमारे १५० शेतकरी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.
दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकण्यास पंचवटी गुन्हे पथकाला यश आले आहे. या चोरट्यांमध्ये दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. तीन जणांकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश वाडेकर करीत आहेत.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने दि. 27 व 28 जानेवारीला महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे आयोजन केले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबईनाका येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेला केंद्रीय मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अंबड घरकुल योजना वसाहतीतील जलकुंभात चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. संदीप दशरथ शिंदे (रा. घरकुल योजना), असे मयत तरुणाचे नाव आहे. २२ जानेवारीपासून तो घरात नसल्याने याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गमे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त निलेश सागर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिकच्या अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (प्रशासन ) रमेश काळे, उपायुक्त (भुसुधार) विठ्ठल सोनवणे, उपायुक्त (नियोजन) मॅचिंद्र भांगे,उपायुक्त राणी ताटे, उपायुक्त (पुनर्वसन) मंजिरी मनोलकर, उपायुक्त (विकास) उज्वला बावके, प्रबोधिनीच्या संचालिका जयरेखा निकुंभ. उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, स्वाती थविल, सीमा अहिरे, हिरामण झिरवाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकारी जतिन रहेमान, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, तहसिलदार शोभा पुजारी, रचना पवार, अमोल निकम, परमेश्वर कासुळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक उपस्थित होते.
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेला निफाड तालुका सध्या कडाक्याच्या थंडीने चांगलाच गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून निफाडसह नाशिकमध्ये तापमानात प्रचंड घट झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. आज शुक्रवारी निफाड तालुक्यात 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पार्श्वभूमी
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभराच्या ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -